माणसाने स्वप्न बघणं कधीच थांबवू नयेत.स्वप्न सत्यात उतरण्यासाठीच असतात.हे वाक्य शशी खंदारे यांच्या बाबतीत खरं ठरलं आहे. क्लॅप बॉय ते दिग्दर्शक हा प्रवास खरचं प्रेरणा देणारा आहे.जिप्सी या चित्रपटातून शशी खंदारे दिग्दर्शकाच्या भुमिकेत पदार्पण करत आहेत.
जिप्सी या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आलं आहे. यश मनोहर सणस त्यांच्या यश सणस फिल्म्स या निर्मिती संस्थेद्वारे बोलपट क्रिएशनस बरोबर जिप्सी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
आतापर्यंत २५ हून अधिक चित्रपटांसाठी क्लॅप बॉय, सहाय्यक दिग्दर्शक अशा विविध जबाबदाऱ्या निभावल्यानंतर शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट घेऊन येत आहे.त्यांचा हा प्रवास खरचं प्रेरणादायी आहे. पुढील महिन्यात चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असून राज्यभरात विविध ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com