अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत असणारा चित्रपट ‘भूत पोलीस’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत ४ लाख पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
भूत पोलीस हा चित्रपट १७ सप्टेंबर रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट १० सप्टेंबर २०२१ ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता.मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
‘भूत पोलीस’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात सैफ अली खानसोबत अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
The post ‘भूत पोलीस’ ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला appeared first on Lokshahi News.
Credits and Copyrights – lokshahinews.com