कल्याण : गोव्यात मिळणारी स्वस्त दारू ठाणे जिल्ह्यात आणून विक्री करण्याचा पराक्रम शनिवारी उघडकीस आला. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने दारूचा साठा, दोन आलिशान वाहनांसह सुमारे पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
नामांकित हॉटेल्समध्ये गोवा बनावटीच्या दारूचा पुरवठा अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातून होत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये मोठे रॅकेट असून त्याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.
तीन आरोपींना अटक, तीन विक्रेते ताब्यात
कल्याणजवळील मलंगगड भागात गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी येत आहे. विशेष म्हणजे डोंबिवली परिसरात निर्माण झालेले मोठं मोठे हॉटेल्स आणि त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूची मागणी होत आहे. त्यामुळे गोवा बनावटीच्या दारूचा मलंगगड भागातून पुरवठा होत असल्याचं समोर आलं आहे.
मलंगगडच्या कुंभार्ली गावात असलेल्या शिव आरती बंगल्याच्या बाजूला पत्र्याच्या शेड मध्ये असलेला गोवा बनावटीचा दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागीय पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी कल्याणच्या काटई गावत राहणारा वासुदेव किसन चौधरी यांच्यासह नेवाळीमध्ये राहणारा रंजन शेट्टी आणि गुलाब अहमद राजा यांना अटक करण्यात आली आहे. यांच्याकडून गोवा बनावटीची पन्नास लाखांची नामांकित कंपन्यांची दारू जप्त करण्यात आली आहे. तर दारू विकत घेणारे तिघे ग्राहक देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहेत.
या प्रकरणात आणखी काही बडे मासे हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व आरोपीना न्यायालयाने चार दिवसांची कस्टडी सुनावली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मलंगगड भागात गोवा बनावटीच्या दारूचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी देखील आठ लाखांची गोवा बनावटीची दारू ताब्यात घेत पाच जणांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत पन्नास लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरीक्षक, राज्य उत्पादन एन.एन.मोरे,दुय्यम निरीक्षक जी.एच.पाटील, आर.एस.राणे, दुय्यम निरीक्षक, अंबरनाथ विभागाचे निरीक्षक घुले, आर.के. शिरसाट, निरीक्षक, डोंबिवली विभागाचे निरीक्षक पवार यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.
गोवा बनावटीची दारूचा थेट ग्रामीण भागातून शहरी भागातून पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असताना स्थानिक पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्याने आचार्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासात आणखी काही बडे मासे गळाला लागतात का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.