
गडचिरोली : राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गुरुवारी २०२०-२१ या वर्षाकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार जाहीर केले आहेत. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला असून, इतर पुरस्कारांमध्येही याच विद्यापीठाचा डंका आहे. राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षात नि:स्वार्थ भावना व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांच्या सेवेचा गौरव व्हावा, या हेतूने १९९३-९४ पासून पुरस्कार देण्यात येतो. यंदा राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारसीनुसार गोंडवाना विद्यापीठाला सर्वोत्कृष्ठ विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सर्वोत्कृष्ठ कार्यक्रम समन्वयक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे डॉ.नरेश मधुकर मडावी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह व १० हजार रुपये रोख असा हा पुरस्कार आहे. सर्वोत्कृ्ष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या कांदिवली येथील ठाकूर विज्ञान व वाणिज्य् महाविद्यालयाचे सुशील राम शिंदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ.विलास वसंतराव कर्डिले, गोंडवाना विद्यापीठांतर्गत राजुरा येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे गुरुदास दादाजी बल्की आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत् लातूर येथील राजर्षि शाहू महाविद्यालयाचे डॉ.कल्याण धोंडिबा सावंत यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह व ५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सर्वोत्कृ्ष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मुंबई विद्यापीठांतर्गत् कांदिवली येथील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठांतर्गत राजुरा येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लातूर येथील राजर्षि शाहू महाविद्यालय यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कारांमध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचे डॉ. योगेश मधुकरराव पोहोकार, सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील सरदार बाबासाहेब माने विद्यालयाच्या डॉ.शरयु हनुमंतराव भोसले, लोणी येथील कृ्षी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रवीण सुखदेव गायकर आणि जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कला, वाणीज्य् व् विज्ञान महाविद्यालयाचे डॉ.सोमीनाथ सारंगधर खाडे यांना मिळाला आहे. उत्कृष्ठ स्वयंसेवक पुरस्कारांमध्ये बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिीट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी राजश्री लक्ष्मणराव माने, नागपूरच्या नागपूर पशुवैद्यक महाविद्याचा दिवेश नंदकिशोर भिन्नारे, नंदूरबारच्या गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचा प्रतीक माधव कदम, परभणीच्या कृषी महाविद्यालयाची सिद्धी भारतराव देसाई, अमरावतीच्या श्री.शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालयाचा अमर अनिल कतोरे, नांदेडच्या सामाजिक शास्त्रे संकुल स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा अमोल उद्धवराव सरोदे, मुंबईतील चर्चगेटच्या के.सी.महाविद्यालयाचा शिवम आशिष पटेल, दापोलीच्या कृषी महाविद्यालयाचा रवींद्र ताराचंद पाटील, पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचा प्रसाद गोरखनाथ वाघमोडे, पुण्याच्या कृ्षी महाविद्यालयाचा अनिकेत रवींद्र वाकळे, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची तेजस्विनी कैलासशेठ वानखेडे, सोलापूरच्या डीएव्ही वेलणकर वाणिज्य महाविद्यालयाचा समर्थ मधुकर धिवरे, सातारा येथील दहीवाडी महाविद्यालयाचा अनिकेत उद्धव वाघमारे व गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व नसरुद्दीन पंजवानी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका शामराव ठाकरे यांचा समावेश आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com