सध्या टीआरपीच्या अग्रस्थानी असलेली देवमाणूस मालिका प्रचंड चर्चेत आहे. बोगस डॉक्टरचे भयाण वास्तव दाखवणारी देवमाणूस मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
काही दिवसांपासून देवमाणूस या मालिकेची प्रचंड चर्चा सुरू आहे. मालिका बंद असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आता मात्र मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं नक्की झालं आहे.
अनेक नवीन मालिकांचे प्रोमो प्रदर्शित होत आहेत. ‘ती परत आलीये’ मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. देवमाणूसच्या वेळेत आता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ किवा १५ ऑगस्ट रोजी देवमाणूस मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com