बाजारात दररोज म्हटलं तरी नवनवीन स्मार्टफोन लाँच (Smartphone Launch) होत असतात. एखाद्या स्मार्टफोनचे फीचर्स (Features) आवडले की, मग तो स्मार्टफोन खरेदी करतातच. असाच एक स्मार्टफोन गुगलने (Google) नुकताच लाँच केला आहे. गुगल कंपनीने आजवर फारच कमी स्मार्टफोन लाँच केले आहेत.
मात्र त्यांचे स्मार्टफोन परफॉर्मन्सच्या बाबतीत चांगले असतात. Google ने आपला नवीन Pixel 5a हा स्मार्टफोन काही निवडक मार्केटमध्ये (Market) लाँच केला आहे. Google चा हा 5G स्मार्टफोन आहे. Google ने स्पष्ट केलं आहे की, Pixel 5a हा फोन 26 ऑगस्टपासून अमेरिका आणि जपानमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
जुन्या मिड-रेंज (Mid- Range) Google डिव्हाइसच्या तुलनेत यामध्ये काही नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये IP67 रेटिंग दिलं आहे. हा स्मार्टफोन वॉटर रेझिस्टंट (Water Resistant) आहे. या स्मार्टफोनला 6.34 इंचाचा डिस्प्ले (Display) आहे. Google Pixel 4a पेक्षा या फोनचा डिस्प्ले थोडा मोठा आहे.
Google Pixel 4a चा डिस्प्ले 6.2 इंचाचा होता. Google Pixel 5a चा 60Hz रिफ्रेश रेट (Refresh Rate) आहे. तसंच या फोनला 4680 mAh ची बॅटरी (Battery) देण्यात आली आहे.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.