रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने खुशखबर दिल्यानंतर आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांकरिता नवरात्रीच्या सुरुवातीला व दिवाळीआधी मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी (State Government Employees) व निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा दणक्यात होणार आहे. ७ वा वेतन आयोग लागू असलेल्या राज्य सरकारी कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या (retired employees) महागाई भत्त्यामध्ये अकरा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी घेतला आहे. ही वाढ १ ऑक्टोबर २०२१ पासून लागू केली जाणार आहे.
महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय
दसरा-दिवाळीच्या (Dussehra-Diwali) तोंडावर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या (State Government Employees) महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. महागाई भत्त्यामध्ये तब्बल अकरा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा वाढीव महागाई भत्ता मिळणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. १ जुलै २०२१ पासून हा वाढीव महागाई भत्ता (Increased dearness allowance) मिळणार आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता देण्यासंदर्भात लवकरच आदेश देण्यात येणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना सरासरी वाढ मिळेल
शासकीय कर्मचाऱ्यांना कमीत कमी दोन हजार दोनशे वीस, तर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये सरासरी वाढ मिळेल. केंद्र सरकारने १ जुलै २०२१ पासून महागाई भत्ता हा १७% वरून २८% केला होता, तर आता ही वाढ राज्य कर्मचाऱ्यांना १ ऑक्टोबरपासून लागू केली जाईल. जुलै ते सप्टेंबर २०२१ ची थकबाकी देण्याबाबत वेगळा आदेश काढण्यात येईल. या वाढीत १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० व १ जानेवारी २०२१ पासूनच्या महागाई भत्त्याचाही समावेश करण्यात आला आहे, परंतु १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७% एवढाच राहील. निर्णयाचा फायदा तब्बल सतरा लाख कर्मचाऱ्यांना आणि ६.५ लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होईल.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.