बहुचर्चित ‘आदिपुरुष’ सिनेमात प्रभास श्रीरामाच्या भूमिकेत तर सितेच्या भूमिकेत क्रीती सेनन झळकणार आहे. तर सैफअली खान रावणाची भूमिका वठवणार आहे. सध्या हनुमानाच्या भूमिकेत कोण असणार, याची चर्चा रंगली होती. अखेर चाहत्यांना याचं उत्तर मिळणार आहे.
‘तानाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमात जबरदस्त यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक ओम राउतने ‘आदिपुरुष’ या सिनेमाची घोषणा केली. पौराणिक कथा रामायण यावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी कलाकारांना संधी देण्यात आली आहे. हनुमानाच्या भूमिकेसाठी कोणता कलाकार झळकणार याविषयी चर्चा रंगल्या आहेत.

जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेसाठी देवदत्तही प्रचंड मेहनत घेतोय. त्यामुळे आता सिनेमाची उत्सुकता ताणली आहे. २०२२ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
The post आदिपुरुषमध्ये ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका appeared first on Lokshahi News.
Credits and Copyrights – lokshahinews.com