तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तिथे हाहाकार माजला आहे. जुलमी तालिबानी राजवटीमधून बाहेर पडण्याकरिता अफगाण नागरिक शक्य तेवढे सर्व प्रयत्न करत आहेत, परंतु यामध्ये शेकडो जण मृत्युमुखी पडत आहेत. एकीकडे काबुलचा पाडाव झाला असला, तरीही आपल्या देशाच्या राजधानीमध्ये वसलेल काबुल आता उत्तमरित्या स्थिरावल आहे. हाशाम खुर्शिदी हा तरूण याच एका रिफ्युजींपैकी आहे. तो म्हणतो की, मी इथे आलोच नसतो तर कधीही मॉडेल झालो नसतो.
अफगाणी लोकांना इथे येण्याकरिता मदत केल्यामुळे मोदी सरकारचे मानले आभार
दिल्लीच्या लाजपत नगर, जंगपुरा भोगल येथे हजारोंच्या संख्येने अफगाण निर्वासित स्थिरावले आहेत. दिवसागणिक या भागात वाढणाऱ्या रिफ्युजींच्या रहिवासी संख्येमुळे या भागातील सगळे स्थानिक मार्केटदेखील वाढत जात आहे. अफगाणी लोकांचे खानपान त्यांना लागणाऱ्या सगळ्याच वस्तूंची दुकाने या सगळ्या गोष्टी या भागात मिळतात. तालिबानने ताबा मिळवल्यानंतर आता आमच्या लोकांना इथे येण्याकरिता मोदी सरकारने मदत केल्याबद्दल बरेच लोक धन्यवाद मानताना दिसून येत आहेत.
…तर मी मॉडेल कधीही झालो नसतो
हाशाम खुर्शिदी हा तरूण याच एका रिफ्युजींपैकी एक असून, मूळ अफगाणिस्तानचा असलेला हाशाम प्रोफेशनल मॉडेल आहे. आमच्या पिढ्यांना इतके मोठे स्वातंत्र्य कधीच मिळाले नव्हते. तेवढे सगळे आम्हाला भारतामध्ये मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जर इथे आलोच नसतो तर मी मॉडेल कधीही झालो नसतो. तालिबान्यांनी हे कधीच होऊ दिल नसत, हे सांगताना त्याचा कातरस्वर लक्षात येतो. आता तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तिथे राहणाऱ्या बारा ते तेरा वर्षांच्या मुलींशी लग्न केली जातील. तसेच तिथल्या लोकांचा खूप छळदेखील केला जाईल, अशी तीव्र भीती हाशाम खुर्शिदी व्यक्त करतो. याक्षणी जगाने आम्हाला मदत करावी, असेही आवाहन तो करत आहे.
हॉटेल, मॉडेलिंग यांसारख्या क्षेत्रामध्ये अफगाण तरूण मोठ्या प्रमाणात
दिल्लीतील लाजपत नगर, जंगपुरा भाेगल, हौज रानी परिसरामध्ये पंधरा हजाराच्या जवळपास अफगाण निर्वासित वास्तव्याला आहेत. उपचाराकरिता व शिक्षणाकरिता भारतात येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. हॉटेल, मॉडेलिंग यांसारख्या क्षेत्रामध्ये अफगाण तरूण, तरूणीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. एक हजारपेक्षा तरूण मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करत असल्याची माहिती हाशाम याने दिली.
Credits and. Copyrights – Maay Marathi