ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) हे एक विदेशी फळ असून, पूर्वी हे फळ फक्त अमेरिकेत (United States) उत्पादित करण्यात येत असत, परंतु आता मात्र भारतामध्ये (India) व महाराष्ट्रातसुद्धा (Maharashtra) काही भागांत आणि प्रांतामध्ये ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतले जाते. या फळाचे आरोग्याला (health) होणारे लाभ प्रचंड आहेत. त्यामुळे आता या फळाला सुपर फुड (Super food) म्हणूनही ओळखले जाते. काही भागांत या फळाला पिताया (pitaya) असेही म्हणतात. कॅल्शियम (Calcium), फॉस्फरस (Phosphorus), लोह ( Iron), सोडियम ( Sodium) अशी खनिजे या फळामध्ये जास्त प्रमाणावर असतात. याव्यतिरिक्त ॲण्टी ऑक्सिडंट्सही जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे हे फळ नक्कीच सुपर फुड आहे.
हिवाळ्यामध्ये (Winter Season) लोकांची प्रतिकारकशक्ती (Immunity) अनेकदा कमकुवत होते. त्यामुळे सर्दी, ताप यांसारख्या आजारांच्या समस्या उद्भवतात. रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याकरिता डॉक्टर विविध प्रकारचे फळांचे सेवन करण्यास सांगतात. अशाप्रकारे बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे आपण रोग प्रतिकारकशक्ती वाढवू शकतात. यापैकी एक म्हणजे ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) ज्यास पिताया (pitaya) असेही म्हटले जाते. हे फळ दिसायला फारच आकर्षक आहे. ड्रॅगन फळ मेक्सिको (Mexico) व मध्य आशियामध्ये (Central Asia) आढळते. ड्रॅगन फळ आतमधून पांढऱ्या रंगाचे असते. त्यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याव्यतिरिक्त या फळामुळे मधुमेह, हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. फायबर्स, ॲण्टी ऑक्सिडंट्स व व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले ड्रॅगन फळ बर्याच गंभीर आजारांवर फायदेशीर ठरते. चला तर आपण या लेखाद्वारे ड्रॅगन फ्रुट आरोग्यासाठी फायदेशीर आहे का ? हे जाणून घेऊ.
सध्या मात्र या फळासंदर्भात असे सांगितले जाते की, डेंग्यू (Dengue) झाल्यावर हे फळ खाणे अतिशय फायदेशीर ठरते. डेंग्यू झाल्यावर रक्तामधील प्लेटलेट्स (Platelets) कमी होतात. ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यामुळे प्लेटलेट्स वाढतात, असे सल्ले हल्ली अनेक वेळा ऐकू येत आहेत, परंतु तज्ज्ञ सांगतात की, ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती (immunity power) निश्चितच वाढते, मात्र त्यामुळे प्लेटलेट्स (Platelets) खरोखरच वाढतात की नाही, हा अद्यापही एक संशोधनाचा (research) विषय आहे. ड्रॅगन फ्रुट खाण्याचा मोठा फायदा (Big advantage) आहे. ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्याकरिता हे फ्रुट खूप उपयुक्त आहे. त्यामुळे हे फळ नियमितपणे खाल्ल्यामुळे बऱ्याच आजारांपासून दूर राहता येणे, सहज शक्य असल्याचेदेखील तज्ज्ञ सांगतात. ड्रॅगन फ्रुटमध्ये जास्त प्रमाणावर लाइकोपीन (Lycopene) असते. यामुळे फ्री रॅडिकल्सचा (free radicals) धोका कमी होतो. त्यामुळे कॅन्सर (Cancer) होण्याचा धोका कमी होतो. ड्रॅगन फ्रुटमध्ये कार्बोहायड्रेट (Carbohydrates) जास्त प्रमाणावर असते. त्यामुळे पचनाच्या समस्या सोडविण्याकरिता हे फळ उपयुक्त ठरते. रक्तामधील साखर नियंत्रणामध्ये ठेवण्याकरिता साखरेमध्ये होणारा चढ-उतार नियंत्रित ठेवण्याकरिता हे फळ उपयुक्त आहे. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांकरिताही ड्रॅगन फ्रुट उपयुक्त ठरते. सौंदर्य वाढविणे, त्वचेवरील सुरकुत्या कमी करणे, याकरिता ड्रॅगन फ्रुट मदत करते. या फळामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तींना अथवा गर्भवती महिलांनाही ड्रॅगन फ्रुट नियमितपणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करत असते. ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. त्याचे नियमित सेवन केल्याने शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.पोटाच्या आजारांकरिता फायदेशीर आहेत. पोटाच्या समस्यांकरिता ड्रॅगन फळ प्रभावी मानले जाते. लोहाची कमतरता दूर करण्यासाठी मदत होते. आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असल्यास, आपण ड्रॅगन फळ घेणे गरजेचे आहे. यामध्ये बीटा कॅरोटीन व लाइकोपीन असते. ज्यामुळे लोहाची कमतरता दूर करणसाठी मदत होते. ड्रॅगन फळांमध्ये कॅरोटीनोईड मुबलक प्रमाणामध्ये आढळतात. नियमित सेवन केल्यामुळे कर्करोग व हृदयरोगाचा धोका कमी होतो. ड्रॅगन फळामध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असतात. ड्रॅगन फळाचे सेवन करणे तुमच्याकरिता फायदेशीर ठरेल. ड्रॅगन फळाच्या सेवनामुळे शरीरामधील हेल्दी बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. तसेच पाचन तंत्राला निरोगी ठेवण्यास मदत होते. विशेष म्हणजे, ड्रॅगन फळाचा वापर डेंग्यूच्या उपचारात उपयुक्त ठरू शकतो. ड्रॅगन फळात बियांमध्ये फायटोकेमिकल व अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. यामुळे हाड, दात मजबूत होतात. यामुळे दमा व खोकला दूर करण्यासाठी मदत होते.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.