मुंबई : मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस बरसत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्यानुसार मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. तर जळगावातील चाळीसगाव, औरंगाबादेतील कन्नड या भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.