मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी दिली आहे. केवळ लसीकरण पूर्ण होऊन 14 दिवस झालेल्या भाविकांनाच ‘ताजिया’ मिरवणुकीत सामील होण्याची परवानगी असेल, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. मात्र रस्त्यावरुन पायी मिरवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. सात ट्रकमधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्यास परवानगी असून, एका ट्रकवर केवळ 15 जणांनाच मुभा देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत डोंगरी ते माझगाव कबरीस्तान दरम्यान या मिरवणुकीची परवानगी असून यासाठी दुपारी 4 ते सायंकाळी 7 पर्यंतची वेळमर्यादा राहील. तसेच या 105 पैकी मिरवणुकीच्या शेवटी केवळ 25 जणांनाच कबरीस्तानात जाण्याची परवानगी असेल, असंही हायकोर्टानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय.
Credits and Copyrights – ratnagirikhabardar.com