सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीस भाविकांनी अर्पण केलेले २८ किलो सोन्याचे दागिने तर ९९६ किलो चांदीचे दागिने वितळवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. याला हिंदू जनजागृती समितीने विरोध केला आहे. याविषयी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दागिन्यांमध्ये काही दागिने शिवकालीन तर काही पेशवेकालीन आहेत. राज्यातील वारकरी परंपरेचा इतिहास महाराष्ट्रातील भावी पिढील होण्यासाठी त्याचे प्रदर्शन भरवावे.
भाविकांनी अर्पण केलेले दागिने वितळवण्याचा अधिकार मंदिर समितीला कोणी दिला? असा सवाल निवेदनात केला आहे. तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.