नेशन न्युज मराठी टीम.
चाळीसगाव/प्रतिनिधी– चाळीसगाव येथील ”स्वयंदीप’ संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग, विधवा, घटस्फोटित व निराधार महिलांसाठी दीपस्तंभ म्हणून काम करत आहे. तत्पूर्वी आत्यंतीक विपरीत परिस्थितीवर मात करून मीनाक्षीताई निकम या असंख्य महिलांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत.दिव्यांगतेवर मात करत असंख्य दिव्यांग,निराधार महिलांसाठी दीपस्तंभ बनल्या आहे. त्याचा इथ पर्येंतचा प्रवास सोपा नव्हता.
चाळीसगाव येथील मीनाक्षीताई निकम ह्या दीड वर्षाच्या असताना पोलिओ झाला. आणि त्यांना अपंगत्वाला सामोरे जावे लागले. त्यात १२ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. तरीही त्यांनी हार मानली नाही. स्वतःला सावरत संघर्ष सुरूच ठेवला. परंतु त्यांना अनेकवेळा भीषण संकटांना सामोरे जावे लागले होते. आशा असख्य संकटावर मात करत त्या स्वयंभू तर बनल्याच पं त्यांनी त्याच्यासारख्या अशा अनेक दिव्यांग, विधवा, घटस्फोटित व निराधार महिलांचा त्या आधार बनल्या.आतापर्यंत दोन हजार महिला ह्या स्वयंदीप’ संस्थेतून प्रशिक्षण घेऊन स्वताच्या पायावर उभ्या आहेत. त्याच बरोबर सध्या शंभर महिला प्रशिक्षण घेत आहे.
एक दिव्यांग म्हणून माझ्यासमोर जी संकटे आली. ती इतरांवर येऊ नये यासाठी त्यांनी ”स्वयंदीप’ नावाची संस्था स्थापन केली. आज हीच संस्था निराधारांसाठी आधारस्तंभ बनली आहे. या संस्थेत दिव्यांग महिलांचा मनोबल वाढविण्यासाठी व त्यांना त्याच्या पायावर उभं करण्यासाठी मोफत शिवण, गारमेंट,फॅशन डिझाईनचा प्रशिक्षण दिले जाते. यामुळे सदर संस्था अनेक निराधार दिव्यांग मुली वा महिलांचा आधारवड झालेली आहे. तत्पूर्वी कुटुंबाने सोडून दिलेल्या मुलींना रोजगारसह घर मिळाले आहे. दरम्यान या सगळ्यांना एका छताखाली आणून त्यांचा मनोबल वाढवित जगण्याची जिद्द मीनाक्षीताई या महिलां मध्ये निर्माण करत आहे. अशा या हिरकणीला नेशन न्यूज मराठी टीम कडून मानाचा सलाम.
Copyrights & Credits – nationnewsmarathi.com