सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘हिरामंडी’ घेऊन येतायत,त्यांनी नुकतीचं ‘हिरामंडी’ या वेबसिरीजची घोषणा केली आहे.संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटसृष्ठीत त्यांच्या करिअरची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने ते नेटफ्लिक्सवर त्यांची पहिली वहिली वेब सीरिज भेटीला आणत आहेत.
ही वेबसिरीज भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या कथेवर आधारित आहे.यातील कथा ‘हिरामंडीच्या’ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर आधारित आहे.’हिरामंडी’ वेबसिरीज एकूण सात एपिसोड ची असणार आहे.
View this post on Instagram
संजय लीला भन्साळींनी बॉलिवूडमध्ये त्यांची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. कारकिर्दीत त्यांनी ‘देवदास’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गोलियों की रास लीला राम लीला’, ‘ब्लॅक, ‘गुजारिश’, ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘पद्मावत’ सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. संजय लीला भन्साळींचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट हे भव्य सेट, रंग-बिरंगी वेशभूषा आणि पात्रांसाठी ओळखले जातात.
The post ‘हिरामंडी’ लवकरचं भेटीला येणार appeared first on Lokshahi News.
Credits and Copyrights – lokshahinews.com