मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनाचा विरोध झुगारत अखेर सांगलीतील झरे गावात बैलगाडा शर्यत भरवलीच. बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणावर पोलिसांनी चरे मारले होते. शिवाय त्याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. तरीही झरे-वाक्षेवाडीच्या हद्दीत असलेल्या एका डोंगरावर 7 बैलगाड्यांची शर्यती पार पडली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांसोबतच शेतकरी नेते सदाभाऊ खोत उपस्थित होते. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बैलगाडा शर्यत प्रेमींनीही येथे उपस्थिती लावली होती. यानंतर गृहमंत्री दिलीप पळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बैलगाडा शर्यत कोणी बंद केला हे सर्वांनाच माहिती आहे. हा प्रश्न राज्यसरकारच्या अखत्यारीत असता तर आम्ही तत्काळ सुरु केला असता. पण हे प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे त्याबाबतीत पाठपुरावा करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, ‘कायद्याने बंदी असताना बैलगाडा शर्यत भरवणे चुकीचे आहे. त्यांच्या नावावर गुन्हे दाखल आहे हे समोर आलं. पण नंतर गुन्हे दाखल नाहीत हे कळलं. याबाबत तपासणी सुरू आहे. बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत. पण, कोर्टनं बंदी घातली आहे. कायदे सगळ्यांना सारखे असतात. कायदा कोणी मोडला असेल तर त्यावर कारवाई केली जाईल’, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.