मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली आहे. राज्यभरात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले. आता या बंदवरून भाजपचे आमदार राम कदम यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. पालघर हत्या प्रकरण, काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या, मुंबई महाराष्ट्रात अनेक निर्भया प्रकरणनंतर ही कधी महाराष्ट्र सरकारला बंदची आठवण कशी आली नाही, अशी विचारणा राम कदम यांनी केली आहे. आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतो. शेतकऱ्यांमुळे पोटाला भाकरी मिळते. पण शेतकऱ्यांच्या आडून महाराष्ट्रातील या तिन्ही पक्षांनी तसेच देशातील विरोधी पक्षाने राजकारण करण्याचं दु:साहस करु नये. जर लोकांना जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडले गेले, तर आम्ही रस्त्यावर उतरू! पालघर हत्या प्रकरण, काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या, मुंबई महाराष्ट्रात अनेक निर्भया प्रकरणनंतर ही कधी महाराष्ट्र सरकारला बंदची आठवण कशी आली नाही, अशी त्यांनी विचारणा केली आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.