मुंबई : ‘दुर्वा’, ‘फुलपाखरु’ या मालिकांच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. (Hruta Durgule Meets Raj thackeray) . उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर ऋताने तरुणाईच्या मनावर गारुड घातलं आहे. त्यामुळेच चाहत्यांमध्ये तिची कायमच चर्चा असते. सध्या ऋता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत झळकत असून ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेमुळे चर्चेत राहणारी ऋता सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच तिने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती पुन्हा चर्चेत आली आहे. सोबत ऋताने नेमकी राज ठाकरे यांची भेट का घेतली? हा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे. अलिकडेच ऋताने राज ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी तिच्यासोबत मन उडू उडू झालं मालिकेतील तिचा सहकलाकार अभिनेता अजिंक्य राऊतदेखील होता. मनसे अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर यावेळचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित ‘दीपोत्सव’ हा कार्यक्रम दरवर्षी ‘शिवतीर्थ’ (छत्रपती शिवाजी महाराज पार्क) येथे साजरा केला जातो. (Hruta Durgule Meets Raj thackeray) यावेळीदेखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी ऋता आणि अजिंक्यने हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऋताला राज ठाकरे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. दरम्यान, या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त शर्मिला राज ठाकरे, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, मनसैनिक आणि दादरकर उपस्थित होते.

This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.
स्रोत: रत्नागिरी खबरदार