पुणे : ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी (HSC Board Exam form date extension) परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे,” अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज ‘सरल डेटाबेस’वरून ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी कालपर्यंत मुदत होती. तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (एचएससी व्होकेशनल) व सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेतंर्गत विद्यार्थी व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, तसेच आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांना बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ३ ते ११ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती.

Download HSC exam books here
स्रोत: रत्नागिरी खबरदार
(HSC Board Exam form date extension)
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.