पुणे : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच जातीवादाचा मुद्दा प्रखरतेने समोर आला असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात मांडले होते. त्यानंतर राज्यात गदारोळ माजला. त्यावर अनेक चर्चा घडल्या. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील टीका केली होती. शरद पवारांच्या या टीकेनंतर आता राज ठाकरेंनी यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंना माझा सल्ला आहे की, प्रबोधनकारांचे लिखाण वाचा, प्रबोधनकारांचे लिखाण नक्कीच त्यांना योग्य रस्ता दाखवेल अशी मला खात्री आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावर आज मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलं आणि यशवंतराव चव्हाण देखील वाचलं. महाराष्ट्र जातीपातीच्या विचारातून बाहेर येणं गरजेचं आहे, हा वक्तव्यमागचा अर्थ होता, असं राज ठाकरे यांनी सांगितले. जातीचं वातावरण तयार करण्यात येत आहे, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तत्पूर्वी, महाराष्ट्रामध्ये जाती पहिल्यापासून होत्या. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल एक अभिमान होता. तसेच जातीवरती मतदानही व्हायचं आणि ते आजही होतं. मला सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये असं दिसतं की, लोकांना जातीबद्दल अभिमान हा आहेच, पण दूसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत गेला आहे. हे महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतीला डाग लावणार चित्र आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.
तसेच प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो. मात्र दूसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष हा वाटणं, हे कधी महाराष्ट्रात नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु झालं. जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या ओळखीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात जातीचा मुद्दा हा सर्वांथाने मोठा झाला असेल, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर. कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता. बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणात मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कोणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले मग माळी समाज मग इतर समाज हे सगळं रचलेलं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.