शिर्डी : देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत. ते सत्यात कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं?, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. शिर्डी येथे श्रीरामपूर व रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा व परिवार संवाद साधण्यासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांची जोरदार फिरकी घेतली. किरीट सोमय्या विरोधात आहेत. त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही, असं पाटील म्हणाले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.