पुणे : पुण्यात सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाला नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील हायवेंबरोबरच, सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत महत्वाचे मुद्दे मांडले. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी अनेक विषयांवर त्यांच्या मिश्किल स्टाईलमध्ये टोलेबाजी केली. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे च्या बांधकामासाठी निधी पुरवण्याचा मुद्दा येताच नितीन गडकरींनी “माझ्याकडे पैशांची कमी नाही आणि मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायलाही जात नाही”, असा टोला लगावला आहे.
”माझं वरळी-वांद्र्याशी भावनात्मक नातं आहे. या कामासाठी ६०-७० हजार कोटी लागले, तरी मी एक असा मंत्री आहे की ज्याच्याकडे पैशांची काही कमी नाही. आणि मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायलाही जात नाही. त्यामुळे पैसा कसा उभा करायचा ही समस्या नाही. हाही बांधायला मी तयार आहे. फक्त त्याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून धोरणात्मक काही निर्णय झाला, तर दिल्लीला नरीमन पॉइंटशी थेट जोडून देण्याच काम मी करून देईन”, असं ते म्हणाले आहेत.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.