मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. “चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. चंद्रकांतदादा हे अवतारी पुरूष आहेत.
चमत्कारी पुरूष आहेत. ते काहीतरी नक्कीच चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना मी समजू शकतो. मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला २५ वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावं लागणार आहे. कारण उद्धवजींच्या नेतृत्त्वात राज्यातील सरकार कायम राहणार आहे. त्यामुळी पाटील यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं मला कळालं आहे. त्यामुळे त्यांना माजी मंत्री म्हणून घ्यायचं नसेल”, असं संजय राऊत म्हणाले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.