पणजी : पुढील वर्षी अन्य पाच राज्यांप्रमाणे गोव्यातही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकविध पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत गोवा दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशसह गोव्यातही निवडणुका लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. तसेच गोव्यात २२ जागांवर शिवसेना लढणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
याशिवाय गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना २२ जागांवर निवडणूक लढणार आहे. आम्ही गोव्यातील निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही. आमची पक्षबांधणी उत्तम आहे. तर कोलकात्यामधील तृणमूल गोव्यात निवडणूक लढवू शकते, तर गोवा महाराष्ट्राच्या शेजारीच आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये कशी कामगिरी केलीय हे तुम्ही पाहू शकता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.