अलीकडच्या काळामध्ये ट्विटरने सेलेब्स व माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात ‘ब्लू टिक’ वितरीत केले आहे. त्यामुळे तुम्हालाही आता तुमच्या ट्विटर खात्याकरिता ब्लू टिक हवी असेल, तर तुम्ही दुर्दैवी आहात. कारण ट्विटरने इच्छुक वापरकर्त्यांचे अर्ज तसेच पुनरावलोकन प्रक्रियेमधील सुधारणांमुळे पडताळणी प्रक्रिया तात्पुरती थांबवली असल्याची पुष्टी केली आहे. ट्विटर व्हेरिफाईड हँडलने आपल्या वापरकर्त्यांशी नुकताच संपर्क साधला आहे. लोकांना प्रक्रिया सुधारित होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे, परंतु ही प्रक्रिया कधी चालू होईल यासंदर्भात कोणत्याही तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. याचा अर्थ असा होऊ शकतो की, आपल्याला काही आठवडे अथवा कदाचित महिने याची प्रतीक्षा करावी लागेल. ट्विटरने नॉन-व्हेरिफाईड युझर्सना प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. तसेच ही सेवा परत आणण्याचे आश्वासनही दिले आहे.
अर्ज करण्याकरिता रोल आऊट प्रवेश तात्पुरता थांबवला
ट्विटरने आपल्या ताज्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे की, “आम्ही व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करण्याकरिता रोल आऊट प्रवेश तात्पुरता थांबवला आहे. जेणेकरून आम्ही अर्ज व रिव्ह्यू प्रोसेस सुधारू शकतो. जे प्रतीक्षा करत आहेत त्यांच्याकरिता हे खूपच निराशाजनक असू शकते, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्हाला काही गोष्टी दुरुस्त करायच्या असून, त्यामुळे आम्ही तुमच्या संयमाचे खूप कौतुक करतो. एका वापरकर्त्याने विचारले की, ब्लू टिककरिता प्रक्रिया चालू करण्यास कितीसा वेळा लागेल?, तेव्हा कंपनीने उत्तर दिले की, “जास्त लोकांना अर्ज करण्याचा पर्याय देण्याआधी आम्ही अप्लाय व पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये काही सुधारणा जारी करण्याकरिता काम करत आहोत. आम्ही पुन्हा यासाठीचा ॲक्सेस सुरू केल्यावर सर्वांना कळवू. अजिबात काळजी करू नका. आम्ही शक्य तेवढ्या लवकर प्राप्त झालेल्या सगळ्यांना अर्जांचा रिव्ह्यू करण्याचे काम करत आहोत.
Credits and. Copyrights – Maay Marathi