नाशिक : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे मंगळवारी विधिवत पूजेने रामकुंडात विसर्जन करण्यात आले. बाबासाहेबांचे स्नेही आणि नागपूर येथील साहित्य प्रसार केंद्राचे विश्वस्त मकरंद कुलकर्णी यांनी पूजन केले. या वेळी ‘अमर रहे, अमर रहे बाबासाहेब अमर रहे’ या घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी मुकुंद कुलकर्णी, नंदन रहाणे, मिलिंद कुलकर्णी, राहुल सराफ, चंद्रकांत चौधरी, नितीन नाईक आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. शंभराव्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली. पंतप्रधान, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह देशभरातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.