अहमदनगर : राज्यात तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे महत्वपूर्ण योगदान असुन राज्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये बहुसंख्य विद्यार्थीशिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांनी राज्यात अनेक विद्यार्थी घडवले असुन ते आज उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.
अहमदनगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तंत्रशिक्षण नाशिक विभागाचे सहसंचालक ज्ञानदेव नाठे, प्राचार्य बाळासाहेब कर्डिले,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जे.डी.कुलकर्णी तसेच शासकीय तंत्रनिकेतन मधील सर्वेत. विभाग प्रमुख उपस्थित होते. सावंत पुढे म्हणाले, येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय 1990 पासुन 17 एकरच्या जागेमध्ये कार्यरत असुन या महाविद्यालयाचे काम समाधान कारक असुन महाविद्यलयाच्या प्रगतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभाग हा सर्वात श्रीमंत विभाग असुन या विभागाच्या स्वतः च्या मालकीच्या 50 हजार कोटी रूपयाच्या जमिनी आहेत. त्याचा वापर उच्च वतंत्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठीच झाला पाहिजे. जेणेकरुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण घेता येईल. राज्यातील सर्व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्याल यांच्या विविध प्रश्नांबाबत लवकरच सर्व प्राचार्यांची एक बैठक पुणे येथील मुख्यालयात आयोजित केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.राज्यात अखिल भारतीय प्रशासकीय सेवेंमध्ये नुकतेच 86 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
उत्तीर्ण विद्यार्थी आता देशातील इतर राज्यात जाऊन महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवतील असा मला विश्वास आहे. राज्यातील आय ए एस अभ्यास क्रमाच्या पूर्व प्रशिक्षण केंद्रांना शासनाकडुन मदत दिली जाईल.यासाठी शासनस्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. नगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय चांगल्या प्रकारे काम करत असुन अहमदनगरचे शासकीय तंत्रनिकेतन राज्यात आदर्श ठरेल, असाही मला विश्वास आहे.यावेळी सामंत यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीयांच्याशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. सर्वांनी अधिक जोमाने अध्यापनाचे काम करुन संस्थेची प्रतिमा अधिक उजळ करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीच्या सुरूवातीला नाशिक विभागाचे सहसंचालक नाठेकर यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य खर्डीकर यांनीमहाविद्यालयाने गेल्या काही वर्षात राबविलेले नाविण्यापूर्ण उपक्रमांची माहितीचे सादरीकरण केले.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.