मुंबई : राज्यातील करोना परिस्थितीने गंभीर स्वरुप धारण केल्यामुळे गुरुवारी राज्य सरकारची महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीत राज्यात आगामी तीन ते चार दिवसांत कठोर निर्बंध लागू करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. अनावश्यक सेवा, रेस्टॉरंट आणि दुकानांच्या वेळेवरही निर्बंध आणले जाऊ शकतात. तसेच मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवासावरही निर्बंध आणण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे.