सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९ ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्ग विमानतळावर पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे आणि या विमानाचे तिकीट आरक्षण आज गुरुवार २३ सप्टेंबरपासून एअर इंडियाच्या www.airindia.in वेबसाईटला सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग एअरपोर्टचे स्टेशन मास्तर समीर कुलकर्णी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ आता सुरू होणार आहे. या विमानतळाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ‘सिंधुदुर्ग एअरपोर्ट’ या नावाने हे विमानतळ सुरू होणार असून ९ ऑक्टोंबर रोजी पहिले विमान प्रवासी घेऊन या विमानतळावर उतरणार आहे. यासंदर्भात विमानतळाचे स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की, ९ ऑक्टोंबर पासून सुरु होणारे हे विमान दररोज असणार आहे. हे विमान दररोज दुपारी ११.३५ वाजता मुंबईहून सुटून ते १ वाजेपर्यंत सिंधुदुर्गात येणार आहे आणि सिंधुदुर्गहून मुंबईला जाण्यासाठी १.२५ वाजता सुटून २.५० वाजेपर्यंत मुंबईत जाणार आहे. हे विमान ७० सीटचे असून केंद्राच्या उडान योजनेत अंतर्भूत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
◼️ स्थानिकांना प्राधान्य
एअर इंडियाच्या कंपनीत जे या भागातील कर्मचारी आहेत त्यांची सिंधुदुर्ग एअरपोर्टला बदली करण्यात येणार आहे जेणेकरून तेथील स्थानिक घरापासून काम करता येईल. लवकरच प्रशिक्षित स्टाफ येथे दाखल होईल. त्याचबरोबर येत्या 1 ऑक्टोंबर पासून सिंधुदुर्ग एअरपोर्टवर आरक्षण खिडकी सुरू होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
◼️ १ तास २५ मिनिटात मुंबई
यावेळी स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की सिंधुदुर्ग ते मुंबई रस्त्याने प्रवास केल्यास सुमारे ९ तास ते २० मिनिटे लागतात पण हाच प्रवास हवाईमार्गे विमानाने केल्यास प्रवाशांसाठी फक्त १ तास २५ मिनिटांचा हा प्रवास असणार आहे त्यामुळे प्रवाशांचा इतर वेळ वाचणार आहे.
◼️ सिंधुदुर्गातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इतर शहरांमध्ये जाण्याची संधी
सिंधुदुर्गातून मुंबईला जाणारे विमान हे मुंबई येथे २ वाजून ५० मिनिटांनी पोचणार आहे आणि त्यानंतर ज्या मुंबई विमानतळावरून विमानसेवा असतात त्या दिल्ली बेंगलोर, कोलकत्ता, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या महानगरात जाणाऱ्या विमानसेवा असतात त्यामुळे या महानगरांमध्ये जायचे असेल तर या विमान सेवेचा फायदा होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.
◼️ उत्तर गोव्यात जाण्यासाठी सिंधुदुर्ग विमानतळ सोयीचे
सिंधुदुर्ग एअरपोर्ट वर उतरल्यानंतर उत्तर गोव्यात जाणार्या प्रवाशांसाठी हे विमानतळ चांगला पर्याय आहे चिपी वरून तेरेखोल, अरंबोल आणि मांद्रेम समुद्रकिनारा-यांसाठी ड्रायव्हिंग अंतर अंदाजे ६० किमी आहे. गोव्याच्या दाबोळी विमानतळाच्या समान आहे त्यामुळे सिंधुदुर्गचे पर्यटन पाहून प्रवासी गोव्याला जाऊ शकतो.
◼️ सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या विमानाची ऑनलाईन बुकिंग सुरु
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ऑक्टोंबरला पहिले प्रवासी विमान उतरणार आहे आणि या विमान नाचे ऑनलाईन बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबर पासून एअर इंडियाच्या www.airIndia.in या वेबसाईटला सुरू झाले आहे. यासाठी प्रवाशांनी SDW हा बुकिंग कोड नोंद करावा, अशी माहिती त्यांनी दिली.
RSS feed. We do not claim the copyright of this post.