कणकवली : कोरोना रुग्णांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग शाखेने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे स्वखर्चातून पी.एस.ए.ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारला आहे. ऑक्सिजन बेडयुक्त सुसज्ज कोविड कक्षही सुरू केला आहे. प्राथमिक शिक्षक समितीचा हा उपक्रम आदर्शवत असाच आहे. या उपक्रमाचे अनुकरण महाराष्ट्र करेल, असे गौरवोद्गार आ. वैभव नाईक यांनी केले. या ऑक्सिजन निर्मिती प्लांट व ऑक्सिजन बेड्युक्त सुसज्ज कोविड कक्षाचे शिक्षकदिनी लोकार्पण झाले. याप्रसंगी आ. नाईक बोलत होते.
चौंडश्वरी सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत, राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यउपाध्यक्ष उदय शिंदे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, तहसीलदार आर. जे.पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आदी उपस्थित होते.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.