मुंबई : आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी नव्हे तर महाविनाश आघाडीचे सरकार आहे; जे फक्त सामान्य जनतेला लुटण्याचे काम करत आहे. सामान्य जनता कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त आहेत आणि येथील सरकार मोठ्या उद्योजकांसोबत व्यवसाय करण्यात व्यस्त आहे. त्यांना सामान्य जनतेच्या समस्यांशी काही देणे घेणे नाही. या सरकारकडे विकासाचा कोणताही मुद्दा किंवा अजेंडा नाही. त्यांचा एकच अजेंडा आहे; तो म्हणजे – मी ही खातो आणि तुम्हीही खा. महाराष्ट्र सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या तीन पक्षांचा हा एकमेव सामान्य करार आहे. मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानांतर्गत कार्यशाळेत भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री आणि प्रदेश प्रभारी श्री. सी.टी. रवी बोलत होते. रवी म्हणाले की, भारतीय जनता पार्टी नेहमीच सेवेवर विश्वास ठेवते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार लोकांची सेवा करतो.
कोरोनाच्या काळात आमच्या पक्षाने खूप चांगले काम केले आहे. राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाची ही कार्यशाळा त्या साखळीचा एक भाग आहे. ज्याद्वारे आपण शहरापासून दुर्गम ग्रामीण भागापर्यंत उत्तम आरोग्य सेवा देऊ शकतो. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान ४ लाखांहून अधिक भाजपा राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक देशभरात कार्यरत होते. आमचे लक्ष्य आहे की, देशभरातील प्रत्येक बूथवर किमान दोन भाजपा स्वयंसेवक उपलब्ध असले पाहिजेत. भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री आणि प्रदेश प्रभारी श्री. सी.टी. रवी यांच्यासह मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार श्री. मंगलप्रभात लोढा, आमदार श्री. आशिष शेलार, संघटन मंत्री श्री. श्रीकांत भारतीय, मुंबई भाजपा सचिव आणि राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाचे संयोजक श्री. प्रतिक कर्पे उपस्थित होते. मुंबई भाजपा वैद्यकीय आघाडीच्या संयोजिका डॉ. स्मिता काळे बंडगर, मुंबई भाजपा वैद्यकीय आघाडीचे सह-संयोजक डॉ. राजकुमार त्रिपाठी, मुंबई भाजपा वैद्यकीय आघाडीचे सह-संयोजक डॉ. विनयकुमार थाठी यांचं या कार्यशाळेसाठी महत्वाचं योगदान आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.