भिवंडी : गेल्या अनेक वर्षांपासून अंजुरफाटा ते वसई-कामणपर्यंतचे रस्ते अतिशय खराब, निकृष्ट दर्जाचे असून यावर्षी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. अनेकदा मोर्चे, आंदोलने करून दुर्लक्ष करण्यात आल्याने आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी खारबाव टोल नाका फोडून टोलवसुली बंद केली.
भिवंडीत चिंचोटी-अंजुफाटा ते माणकोली असे रस्ता रुंदीकरणाचे काम हे बीओटी तत्वावर सुरुवातीला मे.भारत उद्योग लिमिटेड या कंपनीने घेतले होते. भारत उद्योग कंपनीने रस्त्याची कामे अपूर्ण ठेवल्यानंतर व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हा ठेका भरड उद्योग कंपनीने सुप्रीम कंपनीला दिला. सध्या सुप्रीम कंपनी या रस्त्यावर टोल वसुली करत आहे.
चिंचोटी-अंजूरफाटा ते माणकोली या रस्त्याच्या रुंदीकरणाला २८ ऑगस्ट २००९ पासून सुरुवात करण्यात आली होती. हे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने कंपनीला २ वर्ष ६ महिन्यांचा कालावधी दिला होता. परंतु अडीच वर्षांची मुदत पूर्ण होऊनही कंपनीने रस्त्याची आवश्यक असलेली बरीच कामे आजपर्यंत अपूर्ण ठेवलेली आहेत. विशेष म्हणजे कामे अपूर्ण असूनही या कंपनीने १९ जानेवारी २०१२ पासून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे कंपनीला टोल वसूल करण्याचा कंत्राट हा तब्बल २४ वर्ष ३ महिन्यांकरता देण्यात आला आहे, परंतु टोल वसुली सुरु केल्यापासूनच या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत तर आजही अनेक कामे अपूर्ण आहेत.
या मार्गात पडलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात काही दिवसांपूर्वी या भागातील तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने गावात संतप्त वातावरण आहे. नागरीकांनी मनसेमार्फत रस्ते दुरुस्त करून टोलवसुली करा अन्यथा टोलनाका बंद करणे भाग पडेल, असा इशारा दिला होता, मात्र याकडे संबंधित अधिकारी व टोलचालक यांनी लक्ष दिले नाही. परिणामी आज दुपारी ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी टोलनाका फोडून बंद पाडला.
The post अखेर खारबाव-माळोडी टोलनाका मनसेने फोडला appeared first on ठाणे वैभव.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.