मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नव्याने स्थापन होत असलेल्या सिंधुदुर्ग उपपरिसराचे रविवारी उद्घाटन होणार आहे. सिंधुदुर्ग नगर परिषदेच्या सहकार्याने सिंधुदुर्ग उपपरिसर या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होत आहे. रविवारी दुपारी ३ वाजता आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे असतील. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.