भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा शेवटचा आणि पाचवा दिवस आहे. या सामन्यात भारताचा दुसरा डाव सुरु असून फलंदाजांपेक्षा गोलंदाजांनी कमाल केली आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी केली आहे. या दोघांनी 39 वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाने दुसऱ्या डावात ६ गडी गमावून १८१ धावा केल्या. भारताने पाचव्या दिवशी सकाळी ऋषभ पंतला (२२) गमावले. रॉबिन्सनने त्याला बाद केले. त्यानंतर भारताचा डाव लवकर आटोपणार असे सर्वांना वाटत होते, पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नवव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी उभारली. त्यानंतर शमीने मोईन अलीला षटकार ठोकत कसोटीतील दुसरे अर्धशतक साजरे केले. लंचपर्यंत भारताच्या १०८ षटकात ८ बाद २८६ धावा झाल्या आहेत. बुमराह ३० तर शमी ५२ धावांवर खेळत आहे. भारताकडे आता २५९ धावांची आघाडी असून वेगवान गोलंदाज मार्क वुडने इंग्लंडसाठी आतापर्यंत ३ बळी घेतले आहेत.
काय आहे विक्रम?
बुमराह आणि शमी दोघांनी लंचब्रेकपर्यंत 77 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. या दोघांनी 66 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करताच हा रेकॉर्डब्रेक केला आहे. भारताकडून लॉर्ड्सवर मदन लाल आणि कपिल देव यांनी 1982 मध्ये 9 व्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली होती.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.