ओवल मैदानावर भारत व इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात (Fourth Test) दरम्यान भारतीय संघाला सर्वात मोठा झटका बसला आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघाच्या ताफ्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला. भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु पाचव्या दिवशी आणखी दोघा सदस्यांना कोरोना झाल्यामुळे संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. शास्त्रीनंतर बोलिंग कोच भरत अरुण व फिलडिंग कोच आर श्रीधर यांना कोरोना झाला आहे.
५ व्या कसोटी दरम्यान हे सर्वजण विलगीकरणात
शास्त्री हे ५ सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित आढळले होते. त्याची फ्लो चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर भरत अरुण, आर श्रीधर व नितिन पटेल यांना विलगीकरणात ठेवले होते. त्यानंतर पुन्हा सर्वांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यानंतर शास्त्रींसह अरुण व श्रीधर हे सुद्धा कोरोनाबाधित आढळे आहे. त्यामुळे भारत व इंग्लंड यांच्यामधील ५ व्या कसोटी दरम्यान हे सर्वजण विलगीकरणात असतील. दरम्यान या सर्वांना कोरोनाची लागण ही सामन्यादरम्यान झाली नसून एका खाजगी कार्यक्रमावेळी झाली आहे. शास्त्री हे त्यांच्या नव्या पुस्तकाच्या अनावरणाकरिता आयोजित एका कार्यक्रमाकरिता हॉटेलमध्ये असताना या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. कारण या कार्यक्रमाला बाहेरुन बरेचजण आले होते.
पाचव्या कसोटीला दिग्गज फलंदाज मुकण्याची शक्यता
भारताचा दिग्गज फलंदाज व दौऱ्यामधील सर्वात यशस्वी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे चौथ्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण न करता तंबूत विश्रांती करत आहे. रोहितच्या गुडघ्याला थोडी दुखापत असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु आहे. दुखापत अजून वाढू नये याकरिता रोहित विश्रांती घेत आहे. तसेच त्याच्या पायाचा X-Ray ही काढण्यात आला असून त्याचा रिपोर्ट अद्यापही आलेला नाही. रिपोर्ट आल्यानंतर नेमकी दुखापत किती आहे? हे कळणार आहे. त्यानंतरच रोहित मॅनचेस्टरमध्ये होणाऱ्या (Manchester Test) ५ व्या कसोटी सामन्यामध्ये खेळेल का? हे स्पष्ट होईल.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.