नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी 12 डिसेंबर रोजी हिंगणघाट दौऱ्यावर होते. यावेळी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी प्रवीण महाजन यांनी गडकरींना काळी शाई फासण्याचे मनसुबे आखले होते. यासंदर्भात आ. समीर कुणावार यांच्याशी झालेल्या चर्चेची ऑडियो क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर महाजन यांनी माफी मागितली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे रविवारी गडकरींच्या हस्ते नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांना काळी शाई फासण्याचा विदर्भ वाद्यांचा डाव होता. यासंदर्भात विदर्भाचे आंदोलक प्रवीण महाजन यांनी स्थानिक आमदार समीर कुणावार यांना फोन करून आपली योजना सांगितली.
मिडीयापुढे स्टंट करून आम्हाला चर्चेत यायचे आहे असे महाजन यांनी आमदारांना म्हंटले. परंतु, आ. कुणावार यांनी महाजन यांना अशा प्रकारचे कृत्य करण्यापासून परावृत्त केले. अशा प्रकारे शाईफेक करणे योग्य होणार नसल्याचे कुणावार यांनी सांगितले. प्रवीण महाजन आणि आ. समीर कुणावार यांच्यातील संवादाची ऑडियो क्लिप व्हायरल झालीय. याप्रकरणी पोलिसांनी समुद्रपूर तालुक्यातील परडा इथल्या प्रवीण महाजनला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर काही वेळाने प्रवीण महाजनने याचा एक मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. त्यात चुकीने ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. असा कोणताही हेतू नव्हता. यामुळे काही लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाले असतील तर क्षमस्व, असे म्हटले आहे. तसेच माझ्याकडून चुकीने आमदार समीर कुणावार यांच्याशी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली.
माझा याबाबत नामदार नितीन गडकरी साहेबांची मानहानी करण्याचा हेतू नव्हता. असे करावे का, असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी माननीय आमदार समीरभाऊ कुणावार यांना फोन केला. मात्र, असे काही करण्याचा उद्देश नव्हता आणि नाही. त्यासाठी हा खुलासा करीत आहे. काही लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाले असतील तर क्षमा करावी असे महाजन यांनी आपल्या खुलाशात नमूद केलं आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.