मुंबई : साकीनाका परिसरात महिलेवर झालेला बलात्कार आणि उपचारादरम्यान झालेला तिचा मृत्यू यामुळे राज्य सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यातील महिला सुरक्षा तसंच महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना, महिला विषयक गुन्ह्यांचा आढावा घेतला. तसेच, परप्रातीयांची नोंद ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
त्यावरुन, भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांचा गुन्हेगारी कृत्यांमध्ये असलेला सहभाग पाहता मुख्यमंत्र्यांनी याबद्दलही पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेनंतर भातखळखर यांनी सरकारमधील मंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. महिला शोषणाचा आरोप असलेले धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबुब शेख हे परप्रांतीय आहेत?, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ‘परप्रांतियांची नोंद ठेवा’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यांनी दिले आहेत. पण बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्याबद्दल आश्चर्यकारक मौन बाळगलंय. बलात्कारी दरिंद्यांची कुठली जात, धर्म आणि भाषा असते का?, असा प्रश्न भातळखकर यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. तसेच, महिला शोषणाचा आरोप असलेले ठाकरे सरकारचे मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री संजय राठोड,मेहबूब शेख हे परप्रांतीय आहेत का?, असेही ते म्हणाले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.