मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सोमय्या यांनी काल पुन्हा एकदा मुरुड दापोली इथल्या मिलिंद नार्वेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्याची पाहणी केली. नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता दापोलीत समुद्र किनारी बंगला बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. याबाबत तक्रार करुनही नार्वेकरांच्या बंगल्यावर अद्यापही कुठलीही कारवाई झाली नसल्याचं सोमय्या म्हणाले. मिलिंद नार्वेकर हे महाराष्ट्राचे जावई आहेत का? असा सवालही सोमय्या यांनी सरकारला केला आहे.
सोमय्या यांनी काल दापोलीतील नार्वेकरांच्या बंगल्याची पाहणी केली. त्यानंतर आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. नार्वेकरांचा दापोलीतील बंगला अनधिकृत आहे. तो बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत. तर मार्वेकर यांनी बंगला पाडला अशी माहिती मंत्रालयात दिल्याचा दावा सोमय्या यांनी केलाय. 4 हजार स्क्वेअर फुटाचा बंगला बांधतात, नियमांचं उल्लंघन करतात, नार्वेकर काय महाराष्ट्राचे जावई आहेत का? अशा शब्दात सोमय्या यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारलाय.
दुसरीकडे शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव अडचणीत आल्या आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केलीय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीविषयी चुकीची माहिती दिल्याचा ठपका देऊन आयकर विभागाने त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर किरीय सोमय्या यांनी प्रश्न उपस्थित केलाय. ही जी कंपनी आहे, त्यांच्यासोबत तुमच्या आर्थिक व्यवहाराची माहिती देणार का? हवालाच्या मार्फत यूएए सिनर्जी व्हेंचर्समध्ये पैसे गुंतवले. ते पैसे भारतातून ट्रान्सफर करण्यात आले आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. यशवंत जाधव यांनी काळ्याचं पांढरं केलं. मात्र, तो काळा पैसा आला कुठून? हा पैसा महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टचा आङे. त्यामुळे यशवंत जाधव यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.