मुंबईतील दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परिसरात कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी याचं लोकार्पणही करण्यात आलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीचा सर्वप्रथम वापर शिवाजी पार्कमध्ये करण्यात आला. उद्यानातील शिवाजी महाराजांचा पुतळ्याबरोबरच परिसरातील रस्ते, पदपथ आणि चौक येथे कायमस्वरूपी रोषणाई करण्यात आली. ही सर्व विद्युत रोषणाई करण्यासाठी दिव्यांसह इतर सर्व साहित्य हे इटली येथून नेरी या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून मागवलं आहे. दरम्यान, यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

“शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटलीमधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटलीचं लांगुलचालन?,” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.