स्रोत: रत्नागिरी खबरदार
पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. जयंत पाटील यांनी भाजपाने सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम पहावं असा टोला लगावल्यासंदर्भात पुण्यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पाटील यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नका असं म्हणत संताप व्यक्त केला.
करोना काळात अविरत सेवा बजाविणाऱ्या दोन हजार स्वच्छ्ता कर्मचारी आणि ५०० वृत्तपत्र वितरकांचा कृतज्ञता सन्मान सोहोळा पुण्यातील नूमवी शाळेत आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. त्यावेळीच त्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली. जयंत पाटील असं म्हणालेत की भाजपाने हे सगळं राजकारण करण्यापेक्षा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करावं, असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी, “जयंत पाटलांच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही,” असं म्हटलं.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.