८ वर्षापूर्वी अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. त्यानंतर सापडलेल्या सुसाइड नोटवरून सुरज पांचोलीला आरोपी मानण्यात आलं. आतापर्यंत या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. अखेर आठ वर्षानंतर आता या प्रकरणाची सुनावणी सीबीआय न्यायालयात होणार आहे. जिया खान मृत्यू प्रकरणी आतापर्यंत सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता.
बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने ३ जून २०१३ रोजी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. वयाच्या २५ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूला ८ वर्षे झाली तरी अद्याप तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडलेले नाही. तिच्या आत्महत्या प्रकरणी तिचा कथित बॉयफ्रेंड सूरज पंचोलीला अटक करण्यात आली होती. सध्या सूरज जामिनावर बाहेर आहे. तेव्हापासून या प्रकरणी कोणतीही माहिती समोर आली नव्हती. तब्बल आठ वर्षांनी अखेर सत्र न्यायालयाने हे प्रकरण सीबीआय न्यायालयात वर्ग केल्याचं सांगितलं आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com