आज दि 19/8/2021 नाशिक येथे आम आदमी पार्टी प्रदेश राज्य कार्यकारिणी उपस्थित होती. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्य अध्यक्ष श्री रंगा राचुरे जी, उपाध्यक्ष किशोर मांध्यान जी, प्रदेश संघटन मंत्री विजय कुंभार जी, राज्य सचिव धनंजय शिंदे जी यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी व इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला. निवडणूक जिंकण्यासाठी कशी तयारी करावी व कशा पद्धतीची रणनीती आत्तापासूनच आखावी याविषयी राज्य कार्यकारणीकडून मार्गदर्शन करण्यात आले.(Aam Aadmi Party will contest Nashik Municipal Corporation elections under the leadership of Mr. Jitendra Bhave)

यावेळी राज्याध्यक्ष श्री रंगा राचुरे म्हणाले की, जो कोणी पक्षनेतृत्व करणार असेल त्याने सर्वांना सोबत घेऊन चालावे एकजुटीने आपण आम आदमी पक्षाची सत्ता महानगरपालिकेत आणू शकतो. तसेच राचूरे म्हणाले की, जितेंद्र भावे यांनी ऑपरेशन हॉस्पिटल या चळवळीद्वारे जनतेचे लाखो रुपये वाचवले व नाशिक मध्ये आम आदमी पक्षाची निवडून येण्याची अपेक्षा उंचावलेली आहे.
संघटन मंत्री विजय कुंभार म्हणाले की, यावेळी यावेळी कोणी पक्ष सरकारला पाडणार नसून खुद्द जनताच या भ्रष्ट सरकारला घरी बसवेल आणि आम आदमी पक्षाचं सरकार 2024 ला महाराष्ट्रात बसेल. यावेळी संघटनमंत्री विजय कुंभार यांनी लोकशाही पद्धतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारून एक मताने महानगरपालिकेच्या दृष्टीने श्री जितेंद्र भावे यांची नाशिक प्रभारी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.येत्या महापालिकेच्या निवडणुका श्री.जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली यावेळी नाशिक जिल्ह्य़ातील व शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.Jitendra Bhave
Credits and copyrights – nashikonweb.com