प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) विजेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) २ सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले. या बातमीनंतर त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काल मुंबईमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले व सिद्धार्थने शोकाकूल वातावरणात शेवटचा निरोप घेतला. त्याच्या चाहत्यांना व निकटवर्तीयांना अद्यापही हा धक्का पचवणे कठीण झाले आहे. बर्याच सेलिब्रिटींनी सिद्धार्थच्या जाण्याने दुःख व्यक्त केले आहे, तर प्रसिद्ध WWE चॅम्पियन व हॉलिवूड अभिनेता जॉन सिनानेही (John Cena) नुकताच सिद्धार्थच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
जॉन सिनाने सिद्धार्थचा एक फोटो शेअर केला
जॉनने त्याच्या सोशल मीडिया (Social media) अकाऊंटवर सिद्धार्थचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने सिद्धार्थच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला असून, त्याने यासोबत कोणतेही कॅप्शन लिहिले नाही, तर सिद्धार्थचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोला बऱ्याच बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींनीदेखील लाईक केले आहे. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीनंतर त्याचे चाहते त्याच्या आठवणी शेअर करत आहेत. बर्याच जणांनी त्यावर शोक व्यक्त केला आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील दुःख व्यक्त केले. काल मुंबईमध्ये शोकाकूल वातावरणात सिद्धार्थला अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी त्याचे बऱ्याच जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. बिग बॉस (Big Boss) तसेच बऱ्याच मालिकांमधून सिद्धार्थ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शेहनाझ गिल (Shehnaz Gill) व सिद्धार्थची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र उपस्थितीसुद्धा लावली होती. सिद्धार्थच्या जाण्याने त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.
सिद्धार्थ शुक्लाची कारकीर्द
सिद्धार्थ अभिनेतासह मॉडेलही होता. जो हिंदी टेलिव्हिजन व चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’, ‘बालिका वधू’ व ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांकरिता ओळखला जातो. तो बिग बॉस १३ व फियर फॅक्टर खतरों के खिलाडी ७ च्या रिॲलिटी शोचा विजेता आहे. त्याने सावधान इंडिया, इंडियाज गॉट टॅलेंट या मालिका होस्ट केल्या आहेत. त्याने डिसेंबर २००५ मध्ये लॅटिन अमेरिका व आशिया युरोपमधील इतर ४० सहभागींना हरवून जगामधील सर्वोत्कृष्ट मॉडेलचे विजेतेपद पटकावले. २००८ च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेमधून त्याने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. २०१४ मध्ये शुक्लाने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कलर्स या हिंदी वाहिनीवरील बिग बॉस १३ (Bigg Boss 13) या मालिकेमध्ये सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल यांची जोडी चांगलीच गाजली होती. या मालिकेमध्ये दोघे एकमेकांची काळजी घेत असताना दिसले होते. त्यांची केमिस्ट्री फारच गाजली होती. मालिका संपल्यानंतरदेखील चाहते या दोघांना एकत्रच पाहू इच्छित होते. नुकतंच सिद्धार्थ व शहनाज हे करण जौहरच्या बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी स्पर्धकांबरोबर धमाल मस्ती केली होती.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.