उद्देश : कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करुन देणे. साठवणूकीतील नुकसान कमी करणे Kandachal grant scheme complete information
लाभार्थी
कांदा उत्पादन शेतकरी, शेतकरी समुह, कृषि उत्पन्न बाजार समित्या, सहकारी संस्था, नोंदणीकृत कांदा उत्पादक सहकारी संस्था
अर्थसहाय्य
निर्धारीत कांदाचाल बांधकाम खर्च रु.6000/- प्रति मे.टन, अनुदान एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु.1500/- प्रति मे.टन.
योजनेचे स्वरुप
- कांदाचाळीचे बांधकाम विहीत आराखड्याप्रमाणे असणे बंधनकारक.
- 5,10,15,20,25 व 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळींना अनुदानाचा लाभ.
- कांदा पिकाखालील क्षेत्राची 7/12 उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक.
- बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यात प्रस्ताव संबंधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचेकडे दाखल करावा.
- वैयक्तिक शेतकऱ्यास 100 मे.टन तर सहकारी संस्थांसाठी 500 मे.टन चाळी बांधण्याची तरतुद.
पणन मंडळाचे मुख्यालय/विभागिय कार्यालय/जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा कृषि उत्पन्न बाजार समित्या.
राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत -कांदा चाळ अनुदान योजना
कांदा पिकाचे महत्व व व्याप्ती
महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते.
कांदा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारत जगात दुस-या क्रमांकावर असून देशांतर्गत गरजा भागवून भारतातून कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन बहुमोल असे परकीय चलन देखील प्राप्त होते. आजमितीस भारतात सुमारे 5 लाख हेक्टर क्षेत्र कांदा पिकाखाली असून त्यापासून 74 लाख मे.टन उत्पादन मिळते. देशातील कांदा उत्पादनापैकी 26 ते 28 टक्के कांदा उत्पादन (24 लाख मे.टन) हे महाराष्ट्र राज्यात होते. मागील वर्षी देशातून निर्यात झालेल्या 9.44 लाख मे.टन कांद्यापैकी 7 लाख मे.टन कांदा हा महाराष्ट्रात उत्पादीत झालेल्या कांद्यापैकी होता. कांदा निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे.
कांदा साठवणूक
कांदा हा नाशवंत आहे. परंतु भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात कांदा हा अविभाज्य भाग आहे. जून ते ऑक्टोंबर, प्रसंगी फेब्रुवारी पर्यंत रब्बी हंगामात तयार झालेला कांदा पुरवून वापरला जातो आणि म्हणूनच कांदा साठवणुकीची नितातं गरज भासते. कारण या कालावधीत नवीन कांदा कोठेही उ त्पादीत होत नसतो. महाराष्ट्रात स्थानिक व निर्यात लक्षात घेता सन 2013 पर्यंत 8 लाख मे.टन राज्याची साठवणूक क्षमता होणे आवश्यक आहे. खरीप हंगमामात कांदा काढला की, लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो म्हणून किंवा रांगडा हंगामातील कांदा सुकवून साठविला जाऊ शकतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविणेसाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांनामाफक दरात व सातत्याने कांदा उपलब्ध होऊ शकतो.
शास्त्रोक्त पध्दतीने कांदा साठवणूक
कांदा ही एक जिवंत वस्तू आहे. तिचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्यास 45-60 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पध्दतीने साठवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे. कांद्याची शास्त्रोक्त पध्दतीने साठवण केल्यास कांद्याचे साठवणुकीतील नुकसान पूर्णपणे टाळता येणार नाही परंतु ते 15-20 टक्क्यांपर्यंत निश्चित खाली आणता येईल. कारण शास्त्रोक्त पध्दतीने उभारलेल्या कांदाचाळीत 4-5 महिन्यापर्यंत कांदा सुस्थितीत राहू शकतो. त्यामुळे होणारे नुकसान टाळून शेतक-याला आर्थिक फायदा वाढविता येऊ शकतो.
योजना
kandachal
पारंपारिक पध्दतीने कांदाचाळीची उभारणी करताना खर्चात जरी बचत होत असली तरी साठवणुकीतील होणारे नुकसान हे मोठा प्रमाणात असल्यामुळे एकंदरीत या चाळी आर्थिकदृष्टा सक्षम होत नाहीत. त्यामुळे कांद्याच्या शास्त्रोक्त चाळी उभारण्यासाठी ‘ोतक-यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राष्ट्र्ीय कृषि विकास योजने अंतर्गत राज्यात कांदाचाळ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार कांदाचाळीचा बांधकाम खर्च 6000 प्रति मे.टन एवढा निर्धारीत असून बांधकाम खर्चाच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त रु.1500 प्रति मे.टन एवढे अनुदान देण्यात येते. त्यासाठी शेतकऱ्यांनी निर्धारीत आराखडाप्रमाणे बांधकाम करणे बंधनकारक आहे. या योजनेचे निकष पुढील प्रमाणे.
50 टन क्षमतेच्या कांदा चाळीचे अंदाजपत्रक
1. | पाया खोदाईचे काम | 10.2 | ढोबळ मानाने | ढोबळ मानाने | 1700.00 |
2. | पायामधील प्लेन सिमेंट कॉंक्रिट प्रमाण – 1 : 4 : 8 | 2.55 | 1377.50 | घन मी. | 3512.63 |
3. | खांबासाठी पाया सळईसहचे सिमेंट कॉंक्रिट प्रमाण – 1 : 2: 4 | 6.21 | 2202.50 | घन मी. | 13666.51 |
4. | सिमेंट कॉंक्रिट खांबासाठी लोखंडी बार / शिगा | 289.41 | 39.40 | कि.ग्रॅ. | 11402.75 |
5. | स्ट्रक्चरल स्टील (अँगल इ.) | 3314.78 | 42.20 | कि.ग्रॅ. | 139883.72 |
6. | खांबासाठी 2 इंच व्यासाचे लोखंडी पाईप | 104.40 | 175.00 | मीटर | 18270.00 |
7. | ॲजबस्टॉस सिमेंटचे पत्र्याचे छप्पर | 160.00 | 231.25 | चौ.फुट | 37000.00 |
8. | ॲजबेस्टॉस सिमेंटती पन्हाळी (रीज) | 25.00 | 192.50 | मीटर | 4812.50 |
9. | 2 इंच व्यासाचे अर्धगोल बांबु, 3 इंच अंतरावर (तळ व भिंती करीता) | 2798.40 | 10.50 | मीटर | 29383.20 |
एकूण | 259631.31 | ||||
5 टक्के अकस्मित खर्च | 12981.57 | ||||
एकुण | 272612.88 | ||||
4 टक्के व्हॅट | 10904.51 | ||||
33 टक्के अंदाजित किंमतीवर 12.24 टक्के सर्व्हिस टॅक्स | 11011.38 | ||||
एकुण एकंदर | 294528.77 | ||||
(अक्षरी रुपये दोन लाख चौऱ्यानव हजार पाचशे एकोमतीस मात्र) |
25 टन क्षमतेच्या कांदा चाळीचे अंदाजपत्रक
1. | पाया खोदाईचे काम | 3.89 | ढोबळ मानाने | ढोबळ मानाने | 1200.00 |
2. | पायामधील प्लेन सिमेंट कॉंक्रिट प्रमाण – 1 : 4 : 8 | 0.73 | 1377.50 | घन मी. | 1004.20 |
3. | खांबासाठी पाया सळईसहचे सिमेंट कॉंक्रिट प्रमाण – 1 : 2: 4 | 2.34 | 2202.50 | घन मी. | 5151.65 |
4. | सिमेंट कॉंक्रिट खांबासाठी लोखंडी बार / शिगा | 137.38 | 39.40 | कि.ग्रॅ. | 5412.77 |
5. | स्ट्रक्चरल स्टील (अँगल इ.) | 1724.45 | 42.20 | कि.ग्रॅ. | 72771.79 |
6. | खांबासाठी 2 इंच व्यासाचे लोखंडी पाईप | 58.00 | 175.00 | मीटर | 10150.00 |
7. | ॲजबस्टॉस सिमेंटचे पत्र्याचे छप्पर | 83.20 | 231.25 | चौ.फुट | 19240.00 |
8. | ॲजबेस्टॉस सिमेंटती पन्हाळी (रीज) | 13.00 | 192.50 | मीटर | 2502.50 |
9. | 2 इंच व्यासाचे अर्धगोल बांबु, 3 इंच अंतरावर (तळ व भिंती करीता) | 1454.40 | 9.00 | मीटर | 13089.60 |
एकूण | 130522.51 | ||||
5 टक्के अकस्मित खर्च | 6526.12 | ||||
एकुण | 137048.63 | ||||
4 टक्के व्हॅट | 5481.95 | ||||
33 टक्के अंदाजित किंमतीवर 12.24 टक्के सर्व्हिस टॅक्स | 5535.69 | ||||
एकुण एकंदर | 148066.27 | ||||
(अक्षरी रुपये एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहासष्ठ मात्र) |
राज्यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत कांदा उत्पादक शेतकरी, सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समित्या यांनी अधिका-अधिक कांदा साठवणूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी कांदाचाळ अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे निकष खालील प्रमाणे आहेत.
कांदाचाळ अनुदान योजनेचे निकष
लाभार्थी
वैयक्तिक शेतकरी/खरेदी विक्री सहकारी संघ/कृषि उत्पन्न बाजार समित्या/कांदा उत्पादक सहकारी संस्था/विविध कार्यकारी सहकारी संस्था/पणन व प्रक्रिया सहकारी संस्था यांना या योजनेचा लाभ देण्यात येतील.
आराखडे
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर, जि.पुणे यांनी विहित केलेल्या 5,10,15,20,25 व 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळी ठरलेल्या मापदंडाप्रमाणे बांधतील त्यांना अनुदान देय राहील. कांदाचाळीचे आराखडे संबंधित तालुक्याच्या कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यालयात उपलब्ध आहे.
अनुदानाचा दर
कांदाचाळ बांधकामाचा महत्तम मर्यादा रु.6000/- प्रति मे.टन एवढी राहील. त्यांच्या 25 टक्के म्हणजे रु.1500/- प्रति मे.टन एवढे अनुदान देय राहील. अनुदान हे रु.1500/- प्रति मे.टन किंवा बांधकाम खर्चाच्या 25 टक्के जे कमी असेल ते लाभार्थीस देय राहील.
अनुदानाची मर्यादा
वैयक्तिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी रु.1,50,000/- अनुदान देण्यात येईल तर इतर सहकारी संस्था/कृषि उत्पन्न बाजार समित्या/कांदा उत्पादक सहकारी संस्था यांना जास्तीत जास्त 500 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळींसाठी रु.7,50,000/- एवढे अनुदान देण्यात येईल.
अनुदानासाठी अर्ज
कांदाचाळीचे बांधकाम करण्यापुर्वी संबंधीतांनी विहीत नमुन्यातील कांदाचाळीचा आराखडा व अर्ज संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावा. त्यानुसारच कांदाचाळीचे बांधकाम करणे बंधनकारक आहे. कांदाचाळीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यातील कांदाचाळी अनुदानाचा यांच्या प्रस्ताव संबंधीत बाजार समिती यांच्या कार्यालयात खालील बाबीसह सादर करावा. अचूक व परिपूर्ण प्रस्ताव योग्य ती शहानिशा करुन स्विकृत करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती यांची राहील. kandachal
अनुदानासाठी अर्ज
कांदाचाळीचे बांधकाम करण्यापुर्वी संबंधीतांनी विहीत नमुन्यातील कांदाचाळीचा आराखडा व अर्ज संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावा. त्यानुसारच कांदाचाळीचे बांधकाम करणे बंधनकारक आहे. कांदाचाळीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यातील कांदाचाळी अनुदानाचा यांच्या प्रस्ताव संबंधीत बाजार समिती यांच्या कार्यालयात खालील बाबीसह सादर करावा. अचूक व परिपूर्ण प्रस्ताव योग्य ती शहानिशा करुन स्विकृत करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती यांची राहील.
प्रस्ताव सादर करण्याची पद्धत
(अ) वैयक्तिक शेतकऱ्यासाठी :kandachal
1. विहीत नमुन्यातील अर्ज.
2. अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन असावी. 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे. तशी कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडावा.
3. वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे.
4. कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल.
5. लाभार्थींनी कांदाचाळ बांधण्यापुर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात रु.20 च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा.
6. अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा.
7. कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा.
8. अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा.
9. सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येईल.
(ब) सहकारी संस्थानी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करण्याची पद्धत :
सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी कांदाचाळीचे काम चालू करणेपुर्वी कांदाचाळीबाबतचा प्रस्ताव पणन मंडळाचे मुख्य कार्यालये, पुणे येथे खालील बाबीच्या माहितीसह प्रस्ताव तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.
1. संस्थेने कांदा साठवणूक प्रकल्पाची उभारणी सुरु करणेपूर्वी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.
2. संस्थेमार्फत किती मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी उभारणार याबाबत संस्थेच्या संचालक मंडळ सभेत पारीत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत अर्जासोबत जोडावी.
3. प्रकल्पासाठी संस्थेच्या नावे जागा असलेबाबत पुरावा (गाव नमुना क्र.7, 7-अ/12) अथवा करीता कमी 30 वर्षे लीजवर घेतलेली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे.
4. प्रस्तावीत जागेचा स्थळदर्शक नकशा.
5. कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निधीचे नियोजन संस्था कशा रितीने उभारणी करणार याबाबत अर्जात स्पष्ट उल्लेख असावा. kandachal
संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र व अद्ययावत लेखा परीक्षणाची प्रत
उपरोक्त प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या भागातील कांदा पिकाचे उत्पादन व निकड लक्षात घेता संबंधीत संस्थेस कांदा चाळ बांधकामाबाबत तत्वत: मंजूरी कळविण्यात येईल व तदनंतरच कांदाचाळीच्या बांधकामास सुरुवात करता येईल.
अर्ज सादर केलेनंतर सहाय्यक निबंधक स्तरावर केली जाणारी कार्यवाहीkandachal
वर नमुद केलेप्रमाणे वैयक्तिक शेतकरी व सहकारी संस्था यांनी कांदा चाळीचे बांधकाम झाल्यानंतर योग्य कागदपत्रासह सहपत्रीत केलेले प्रस्ताव कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या कार्यालयाकडे दाखल करावा. प्रस्तावांची छाननी केलेनंतर प्रत्यक्ष कांदाचाळीची पाहणी केल्यानंतर बाजार समिती मार्फत अर्ज स्विकृत करण्यात येईल. क्ष्यानंतर पणन मंडळाचा प्रतिनिधी, बाजार समितीचा प्रतिनिधी व सहाय्यक निबंधक यांचा प्रतिनिधी ही त्रिसदस्यीय समिती प्रत्यक्ष कांदाचाळीची पाहणी करतील. व शासन निर्णयात नमूद केलेनुसार मापदंड पूर्ण करणा-या कांदाचाळींना अनुदानाची शिफासर समिती करेल. लाभार्थींना अनुदानाबाबत खालीलप्रमाणे कार्यप्रणालीचा वापर करण्यात येईल.
1. ज्या कांदाचाळींचे बाँधकाम पूर्ण आहे आणि अनुदानाची शिफारस केलेले आहे अशा कांदाचाीची त्रिसदस्यीय समिती व शेतकरी यांचा फोटोग्राफ घेऊन तो प्रत्यक्ष तपासणी सूची सोबत जोडण्यात येईल. क्ष्यावर अशा फोटोवर समिती सदस्य स्वाक्षरी करेल. kandachal
2. ज्या कांदाचाळ बांधकामामध्ये अपूर्णता आहे किंवा प्रस्तावामध्ये त्रुटी आहेत किंवा बांधकामामध्ये त्रुटी आहेत अशा चाळींबाबत त्रिसदस्यीय समिती लेखी स्वरुपात वैयक्तिक ‘ोतकरी व बाजार समिती यांना लेखी त्रिसदस्यीय समितीच्या स्वाक्षरीसह कळवतील व असे प्रस्ताव त्रुटी पूर्ततेसाठी बाजार समितींना परत करतील त्रुटींचे प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठविता येणार नाहीत.
3. कांदाचाळी यांचे बांधकाम नियमानुसार नाही किंवा खोटे प्रस्ताव दाखल केलेले आहेत असे प्रस्ताव समिती कायमस्वरुपी रद्द करतील.kandachal
4. बाजार समिती त्रिसदस्यीय समितीने शिफारस केलेले व कायमस्वरुपी रद्द केलेले प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीचा वापर करुन बाजार समितीस ही पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे वर्ग करतील.
5. विभागीय कार्यालयातून ऑन लाईन पध्दतीचा वापर करुन संपूर्ण नावाची छाननी करुन यापूर्वी अनुदान न दिल्याची खात्री पटल्यानंतर मुख्यालयास अनुदानासाठी त्रसदस्यीय समितीच्या तपासणू सूची व विभागीय उपसरव्यवस्थापक यांच्या शिफारशीसह मुख्यालायस अनुदानासाठी वर्ग करतील.
6. मुख्यालयामार्फत प्राप्त त्रिसदस्यीय समितीचे अहवाल, विभागीय व्यवस्थापक यांचे अभिप्राय यांची छाननी करण्यात येईल.
7. छाननी अंती पात्र लाभार्थींच्या नावे अनुदान मंजूरी आदेश मुख्यालयामार्फत काढण्यात येतील व वैयक्तिक लाभार्थीस धनादेशाद्वारे अनुदाने वितरण करण्यात येईल.kandachal
कांदा चाळीची उभारणी करताना घ्यावयाची काळजीkandachal
सुधारीत पद्धतीनुसार कांदा चाळींमधील कांद्याला सर्व बाजूंनी हवा खेळती राहील या दृष्टीने आराखडा तयार केले आहेत. अनुदानास पात्र चाळींची उभारणी करताना खालील बाबींची दक्षता घेणे आवश्यक आहे.
1 जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाया खोदुन आराखडामध्ये दर्शविल्यानुसार सिमेंट काँक्रेटचे पिलर/कॉलम उभारणे आवश्यक आहे.
2 कांदा सावणूकीची जागा जमिनीपासून दिड ते तीन फूट उंच असणे आवश्यक आहे. तथापी, ज्या भागात अती आर्द्रता असते अशा भागात खालील बाजूस हवा खेळती राहण्यासाठी मोकळी जागा सोडणे बंधंनकाराक असणार नाही. परंतु अतिउष्ण हवामानाच्या जिल्ह्यामध्ये खालील बाजूस मोकळी हवा खेळती राहील, यादृष्टीने कांदाचाळीची उभारणी करावी.
3 या पिलर/कॉलमवरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारे चाळीचा संपुर्ण सांगाडा तयार करावा.
4 एक पाखी कांदा चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर तर दुपाखी कांदाचाळी उभारणी पुर्व-पश्चिम करावी. कांदाचाळी साठी छपरासाठी सिमेंटचे पत्र अथवा मेंगलूर कवले यांचा वापर करावा. शक्यतो लोखंडी पत्र्याचा वापर टाळावा, वापर केल्यास त्याला आतील बाजूस पांढारा रंग द्यावा. बाजूच्या भिंती व तळ यासाठी बांबू अथवा तत्सम लाकडी पट्टा यांचा वापर करावा. तर पाया आर.सी.सी. खांब/स्तंभ उभारुन करावा.
5. 25 मे.टन कांदाचाळी साठी लांबी 40 फुट (12 मी), प्रत्येक कप्प्याची दुपाखी चाळीसाठी रुंद 4 फुट (1.20 मी), बाजुची उंच 8 फुट (2.4 मी) मधली उंच 11.1 फुट (3.35 मी), दोन ओळीतील मोकळ्या जागेची रुंद 5 फुट (1.50 मी), कांदाचाळीची एकुण रुंद 4 अ 5 अ 4 उ 13 फुट (3.9 मी) अशा रितीने कांदा चाळीचे बांधकाम करताना आकारमान घ्यावीत. चाळीची आतील कप्प्याची रुंदी ही 4 फुट (1.20 मी) पेक्षा जास्त नसावी. 50 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी लांबीचे प्रमाण दुप्पट करावे व रुंदी/उंचीचे प्रमाण हे 25 मे.टन क्षमतेप्रमाणे कायम राहील.
6 कांद्याची साठवणूक फक्त 5 फुटांपर्यंत करावी.
7 चाळाच्या छतास पुरेसा ढाळ द्यावा. कांदा चाळीच्या छतासाठी वापरण्यात आलेले पत्रे बांधकामापेक्षा 1 मीटर लांब असावेत व छताचा कोन 22 अंश अंकाचा असावा.kandachal
8 कांदाचाळीचे छत हे उन्हाळ्यामध्ये उष्णता प्रतिबंधक वस्तुंनी अच्छादीत करावे.
कांदाचाळीची उभारणी करताना खालील गोष्टी टाळाव्यात
1 कांदा चाळीसाठी पानथळ/खोलगट ठिकाणीची कच्चे रस्ते असणारी जमीन टाळावी.
2 हवा नैसर्गिक रित्या खेळती राहण्यास असलेले अडथळे टाळावे अथवा कमी करावे,
3 कांदा चाळीचे लगत कोणतेही उंच बांधकाम असू नये.
4 निवाऱ्याच्या बाजूच्या भिंतीची फ्लॅट फॉर्मची खालील झडप बंद असावी, जेथे वादळ आणि वादळी वारे अपेक्षीत आहे, अशा ठिकाणी हवेची/वाऱ्याची बाजू उघडी असेल तर निवाऱ्याची बाजू बंद असु नये.
5 वादळ आणि जोरदार पावसामध्ये वाऱ्याची बाजू बंद करण्याची व्यवस्था असावी. आवश्यकता असेल तेव्हा उघडता यावी.
6 कांदाचाळींमध्ये वरच्या बाजूस उष्णता प्रतिबंधक छताचे साहित्याचा वापर करावा. छतासाठी लोखंडी पन्हाळी पत्र्यासारख्या साहित्याचा वापर टाळावा,
सदर प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था/सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था,/कृषि उत्पन्न बाजार समित्या किंवा पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा पणन मंडळाचे मुख्य कार्यालय किंवा पणन मंडळाचे विभागीय कार्यालय पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर यांच्याशी संपर्क साधावा-kandachal
मुख्य कार्यालय
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, प्लॉट नं.आर-7, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे-411 037. फोन नं.- 020-24261190, 24268297 |
विभागीय कार्यालय
नविन कॉटन मार्केट यार्ड, एस.टी.स्टँड समोर, गणेशपेठ, नागपूर 440 018 फोन – (0712) 2722997 |
विभागीय कार्यालय
जुने कॉटन मार्केट यार्ड आवार, अमरावती 444 601 फोन – (0721)-2573537 |
विभागीय कार्यालय
कृषि उत्पन्न बाजार समिती,नाशिक, मार्केट यार्ड, नाशिक फोन – (0253) 2512176 |
विभागीय कार्यालय
जाफरगेट जवळ,बाजार समिती शॉपिंग सेंटर, पहिला मजला, औरंगाबाद फोन – (0240)-2334168 |
विभागीय कार्यालय
कृषि उत्पन्न बाजार समिती, लातूर ,मार्केट यार्ड, लातूर. फोन – (02382)212061 |
स्त्रोत :
Credits and copyrights – nashikonweb.com