आपल्या वादग्रस्त विधानांनी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut ) नेहमीच चर्चेत असते. नुकतेच . कंगनाचं ट्विटर अकाउंट कायमचं निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ती ती इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय झाली होती. मात्र आता तिचं इन्स्टाग्राम अकाउंट सुद्धा हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) स्वतः पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तालिबान्यांवर आधारित एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तिचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं होतं.
अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करून ही माहिती दिली आहे. यात तिने लिहिलं, “काल रात्री मला इन्स्टाग्रामवर अलर्ट मिळाला की चीनमधील कोणीतरी माझं खातं हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. नोटिफिकेशन देखील अचानक गायब झालं आणि आज सकाळी मी पाहिले की तालिबानवर लिहिलेल्या माझ्या सर्व पोस्ट गायब झाल्या. माझं इन्स्टाग्राम अकाउंट बंद झालं होतं.” कंगनाला जेव्हा तिचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद झाल्याचं कळलं त्यानंतर तिने इन्स्टाग्राम कार्यालयात माहिती दिली. त्यानंतर तिला एक्सेस मिळाला देखील होता. पण मी जेव्हा काही लिहायला घेतलं की अकाउंटमधून मी आपोआप लॉगआउट झाले होते.
अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) दावा केलाय की, तिचं इन्स्टाग्राम अकाउंट भारत नव्हे तर चीनमधून हॅक करण्याचा प्रयत्न केलाय. हे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचं देखील तिने या स्टोरीमध्ये म्हटलंय. कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. तिचे अनेक फॅन्स या पोस्टवर कमेंट्स करताना दिसून येत आहेत.
Credits and Copyrights – lokshahinews.com