जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार (Chairman Kanhaiya Kumar) व गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mewani) या महिन्याच्या अखेरपर्यंत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसशी संबंधित सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, जर पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेली उलथापालथ आगामी काही दिवसांमध्ये पूर्णपणे संपुष्टात आली, तर कन्हैया कुमार व जिग्नेश मेवानी हे २८ सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.
पंजाब काँग्रेसमधील राजकीय पेच
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Chairman Hardik Patel) या दोन्ही नेत्यांमध्ये व काँग्रेसच्या पक्षनेतृत्वासोबत मध्यस्थी करत आहेत. काँग्रेसमधील एका सूत्राने सांगितले की, जर पंजाब काँग्रेसमधील राजकीय पेच हा पूर्णपणे निवळला तर कन्हैया कुमार व जिग्नेश मेवानी २८ सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.
गुजरातमधील या मतदारसंघात विजय मिळवला
मूळचा बिहारमधील असलेला कन्हैया कुमार जेएनयूमध्ये झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीमुळे चर्चेत आला होता. त्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) बेगुसराय येथून भाजप नेते गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांना आव्हान दिले होते, परंतु तिथे त्याचा दारुण पराभव झाला होता. दुसरीकडे मागासवर्गीयांचे राजकारण करणाऱ्या जिग्नेश मेवानीने (Jignesh Mewani) २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) गुजरातमधील वडगाम विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.