
कणकवली : कणकवलीतून हळवल मार्गे शिवडावला जाण्यासाठी सायंकाळच्या वेळेत एसटीची बस फेरी सुरू नव्हती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. या समस्याबाबत शिवसेनेचे नेते बाळा भिसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयास भेट दिली आणि प्रभारी विभाग नियंत्रक रमेश कांबळे यांचे लक्ष वेधले. त्यानंतर सोमवार 9 ऑगस्टपासून संध्याकाळी 5 नंतर कणकवली ते शिवडाव एसटी फेरी सुरू करण्याचे दिले आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला कांबळे यांनी दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, कणकवली नगरसेवक कन्हैया पारकर, माजी सभापती संदेश पटेल, उपविभागप्रमुख व्यंकटेश वारंग, ज्येष्ठ शिवसैनिक संजय पारकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com