नियोजनबद्ध कार्यपद्धती व शिस्तप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवशंकरभाऊंच्या नेतृत्वात श्रीगजानन महाराज संस्थानचा नावलौकिक संपूर्ण देशभर पसरला आहे. त्यांचे हे कार्य देशभरातील सर्व संस्थांना व्यवस्थापनशास्त्रातील मार्गदर्शक ठरणारी आहे. राजकीय व्यक्तींमध्ये वरिष्ठांपर्यंत त्यांचे संबंध होते. शेगाव नगरपालिकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शहराच्या विकासाकरिता राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर केला विकास आराखड्यात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भाऊंचे मार्गदर्शन हे विकासाकरिता मैलाचा दगड ठरले आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com