अभिनेत्री केतकी चितळे आणि विवाद हे समीकरण आता नवं नाही. अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे केतकी चर्चेत राहते. तर अनेकवेळा तिच्या सोशल मीडिया पोस्टही (Social media post) विवादीत ठरतात. एपिलिप्सी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली केतकी चितळे पुन्हा एका चर्चेत आली आहे. यावेळी ती केवळ वादग्रस्त विधानांत अडकली नाही तर तिच्यावर गुन्हा (FIR) देखील नोंदवण्यात आला आहे.Ketki Chitale

मागील वर्षी मार्च महिन्यात हे प्रकरण सुरु झाले. जेव्हा केतकीने एका वादग्रस्त पोस्ट केली होती.तर यासंदर्भात आता ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला (Pre-arrest bail Rejected) आहे. त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली आहे.सोशल मीडियावर सक्रिय असणारी केतकी नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट करत असते.अनेकवेळा तिच्यावर टीकाही केली जाते. परंतु ती याकडे लक्ष देत नाही.परंतु केतकीने 1 मार्च 2020 रोजी एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती.या पोस्टमुळे तिच्यावर टीका तर झालीच शिवाय गुन्हा ही दाखल झाला.
केतकीने वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे 3 मार्च 2020 रोजी वकील स्वप्नील जगताप यांनी नवी मुंबई येथील रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळे व सुरज शिंदे ) विरुद्ध जाती व जमाती अत्याचार प्रतिबंद कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर केतकीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.परंतु कोर्टाने आता तिचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला आहे.ठाणे कोर्टाने केतकीला हा मोठ्ठा धक्का दिला आहेत.त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.Ketki Chitale
चितळे बाईचा पराक्रम :
१ मार्च २०२० रोजी तिने सोशल मीडियावर नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात तो धर्म विकासासाठीचा हक्क अशी पोस्ट केली होती. या तिच्या पोष्टवर टीकेची झोड उठली होती.
तिच्या याच विधानावर ॲड स्वप्नील कविता गोविंद जगताप यांनी रबाळे पोलिस ठाण्यात केतकी चितळे आणि सूरज शिंदे या दोघांवर अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (s)(u)(v) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या नंतर अटक पूर्व जामिनासाठी केतकी चितळे हिने ठाणे स्पेशल कोर्टात धाव घेतली होते. काल कोर्टाने केतकीच्या अटक पूर्व जामीन नामंजूर केला आहे. तिला आता जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये ॲड अमित कटारनवरे यांनी युक्तिवाद केला. तसेच सोबत ॲड स्वप्नील जगताप ॲड आदी कटारनवरे ॲड सतीश अंकुश यांनी या केसमध्ये त्यांना मदत केली.
Credits and copyrights – nashikonweb.com