मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
आता पर्यावरण मंत्रालयानं परबांचा रिसॉर्ट बेकायदा असल्याचं ठरवलं, असं ते म्हणाले. यासंबंधीचे पैसे कसे आले, यासंबंधी आता आम्ही याचिका दाखल करणार असून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सोमय्यांनी केली.